कॅन्सरची लक्षणे
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
आधिच्या लेखात आपण कॅन्सर बद्दल सर्वसाधारण माहिती घेतली. कॅन्सरचे १००हून अधिक प्रकार आहेत त्यामुळे कुठल्या अवयवाला कॅन्सर झालाय त्याप्रमाणे त्याची लक्षणे वेगवेगळी असतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे:
❖ न भरणारी जखम.
❖ शरीरात कोठेही आढळणारी, वेदनारहित गांठ.
❖ त्वचेवर लाल चट्टे उठणे.
❖ थोड्याशा श्रमाने दम लागणे.
❖ श्वास घेण्यास त्रास होणे.
❖ सतत खोकला येणे.
❖ आवाज बदलणे.
❖ वारंवार ताप येणे.
❖ अचानक वजन कमी होणे.
❖ अचानक एखाद्या अवयवाची कार्यक्षमता कमी होणे.
उदाहरणार्थ हातापायाच्या हालचाली मंदावणे, दृष्टी
मंदावणे.
❖ वारंवार तोंड येणे, तोंडामध्ये पंधरा चट्टा दिसणे.
❖ अन्न गिळताना त्रास होणे.
❖ अपचन, सतत होणारी असिडीटी.
❖ पोट दुखणे, पोट अचानक पुढे येणे.
❖ मलमूत्र विसर्जनाच्या सवयीत झालेला बदल.
❖ रक्तमिश्रित मूत्र, वारंवार मूत्राप्रवृत्ती.
❖ गुदद्वारातून होणारा रक्तस्राव.
❖ मळमळणे, काविळी सारखी लक्षणे.
❖ स्तनांमध्ये गांठ येणे.
❖ स्तनांच्या आकारात बदल होणे.
❖ स्तनाग्रातून स्राव होणे, स्तनाग्रे आतमध्ये जाणे.
❖ ओटीपोटातवेदना.
❖ मासिक पाळीच्या वेळी अधिक होणारा रक्तस्राव.
❖ दोन मासिक पाळीच्या मधे होणारा रक्तस्राव.
❖ शरीरसंबंधा नंतर होणारा रक्तस्राव.
❖ रजोनिवृत्ती नंतर होणारा रक्तस्त्राव.
❖ स्मृतिभ्रंश, चक्कर येणे, डोके दुखणे.
❖ कुठलेही काम करताना उत्साह नसणे.
❖ सतत निराशाजनक विचार येणे.
❖ दुःख वाटणे, सतत रडू येणे.
आजाराची लक्षणे म्हणजे काय तर मनाने , शरीराने वाजवलेल्या धोक्याच्या घंटा. काहीतरी बिघडलय, बिनसलय. आपल्याला लहानपणापासून आपल्या शरीराने- मनाने दिलेले धोक्याचे सिग्नल ओळखायला शिकवलेलेच नाही. दुखण्यादुखण्यातला फरक कसा ओळखायचा ही तर लांबची गोष्ट. उदा. डोके दुखणे हे अगदी कधीना कधी तरी होतेच. पण सर्दी झाल्यावर , अर्धशिशी झाल्यावर, न जेवल्यामुळे पित्त झाल्याने, मनाचा क्षोभ झाल्यावर – डोके वेगवेगळ्या तर्हेने दुखते. दुखण्याचा बाऊ करू नये पण दुर्लक्षही करू नये. घरातील नावडत्या व्यक्तीच्या दुखण्यावर फारच टीका होत असते.
वरीलपैकी एक किंवा अनेक लक्षणे आढळून आली तरी घाबरू नये परंतु दुर्लक्षही करू नये. एकच लक्षण अनेक रोगांमधे सारखे असू शकते म्हणून घाबरू नये. उदा. पोटात दुखणे हे अल्सरचेही लक्षण आहे आणि पोटाच्या , बीजांडाच्या कॅन्सरचेही आहे. कॅन्सरच्या प्रारंभिक अवस्थेत खूपदा काहीही किंवा अतिशय नगण्य त्रास होतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मग कॅन्सर जेव्हा तिसर्या किंवा चौथ्या स्टेजला जातो तेव्हा एक किंवा अनेक लक्षणे तीव्रतेने जाणवू लागतात. अतिशय वेदना सुरु होतात. तेव्हा तब्येतीकडे दुर्लक्ष करायचा पश्चात्ताप होतो. प्रारंभिक अवस्थेतील कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. तेव्हा वेळीच डॉक्टरांकडे जाउन काळजी घेतलेली बरी.
पुढच्या लेखात आपण कॅन्सरच्या कारणांचा परामर्श घेऊ.
© डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
लेख कृपया लेखिकेच्या नावासहित शेअर करावा.
कॅन्सरबद्दल अधिक माहितीसाठी http//:www.CancerManthan.com हे संकेतस्थळ पाहावे.
