Amaranth Vegetable (देठाची भाजी)
खूप ऍसिडिटी होतेय का तुम्हाला? जुलाब? थकवा? तोंडाची चव गेली आहे. काही पचत नाही? जाड किंवा लाल तांदळाची पेज हा या सर्वांवरचा सोप्पा उपाय आहे.
आशियातील तांदूळ पिकविणाऱ्या देशांमध्ये म्हणजे भारत, बांगलादेश पासून ते चीन, इंडोनेशीया, जपान पर्यंत तांदळाची पेज लोकप्रिय आहे. चीन मधे पेजेला ‘कांजी’ म्हणतात! भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात राहणाऱ्या, उन्हातान्हात काबाडकष्ट करणार्या लोकांची ती न्याहरी आहे.
पेजमुळे शरीर थंड राहाते, ऍसिडिटी कमी होते, पोटातील चांगल्या जीवाणूंना बळ मिळते, पचन सुधारते.
माझ्या दीर्घ आजारात आणि त्यानंतरही वर्ष दोन वर्षे मी नियमाने रोज दिवसातून 2-3 वेळा तांदूळाची पेज घेत असे.
आजकाल ऍसिडिटी ही एक मोठी समस्या झालेली आहे. रुग्ण आणि सर्वसामान्य माणसे दोघांनाही ऍसिडिटी कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधे घेण्यापेक्षा हा सोपा, घरगुती उपाय करून पाहायला काय हरकत आहे?
