Mash Melon Porridge (चिबुडाचे पायसम)
मराठी
चिबूडाचे पायसम्
खरबूज टरबूजाच्या कुळातील चिबूड हे फळ आहे. श्रावण ते दिवाळी पर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात पिकविले जाते. चवीला गोड, रसदार, पोटभरे असे हे फळ. ज्यूस, मिल्कशेक बनवा किंवा नुसतेच थोडी साखर, काळेमिरी टाकून खा लगेच तरतरी आणते. गणपती – नवरात्रात चिबूडाचा मोठा मान. गणपतीच्या प्रसादासाठी चिबूड हवेच. तसेच नवरात्रात उपवास करणार्यांना चिबूडाचा मोठा आधार. गोव्यात कारवारमधे दिवाळीत या चिबूडाच्या पायसम् मधे पोहे टाकून खाल्ले जातात.
चिबूड, नारळ आणि गूळ अशा आजूबाजूला सहज उपलब्ध असणार्या गोष्टी वापरून बनवलेली ही खिर नक्कीच एखाद्या कोंड्याचा मांडा करणार्या चतुर गृहीणीने शोधलेली असणार. गोडधोड , आरोग्यदायी आणि कमी खर्चात बनणारे पक्वान्न खाउन गरीब श्रीमंत सगळ्यांना सण साजरा करता येतो.
English
