Koral Dal (कोरळाची आमटी) पावसाळी रानभाज्या
Mansoon Special Vegetables Koral Dal (कोरळाची आमटी)
धरती प्रखर उन्हाने पोळल्या नंतर मोसमी पाऊस ढगांच्या गडगडाटासह वाजतगाजत येतो. पहिल्या पावसाच्या सरींनी धरणी भिजली की मातीत झोपलेल्या नाना तर्हेच्या बियांना आणि कंदांना जाग येते. नाना परिच्या वेली, झुडूपे, गवत धरणीला हिरवा शालू नेसवतात. काही दिवसांचे, आठवड्यांचे क्वचित महिन्यांचे आयुष्य असते यांना. खूपशा वनस्पतींमधे औषधी गुणधर्म असतात. काही वनस्पतीं खाण्यासाठी वापरल्या जातात. जंगलकन्या असणार्या आदिवासी स्त्रियांना याचे ज्ञान असते.
पावसाळा सुरु झाला की आदिवासी बायका बाजारात नाना तर्हेच्या भाज्या, पाला, फळे घेउन येतात.पावसाळ्याच्या चार महिन्यात टप्याटप्याने वेगवेगळ्या भाज्या बाजारात उपलब्ध होतात. या भाज्यांबद्दल लोकांमधे अज्ञान आहे. आईआजी खेरीज घरात दुसरे कोणी या भाज्या खात नाहीत. औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्या चविष्ट, आकर्षक रूपात या ह्विडीओं मधे सादर केल्या आहेत.
या भाज्यांच्या मांदियाळीत बिनीचे शिलेदार आहेत कोरळाची पाने आणि फोडशी ( कुळी, कुंबळी).
लवकर लवकर बाजारात जाऊन या भाज्या घेऊन या कारण जेमतेम पंधरावीस दिवसच या भाज्या उपलब्ध असतात.
