Cancer Manthan https://cancermanthan.com Cancer Patient sharing experience Fri, 28 Aug 2026 18:34:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1 https://cancermanthan.com/wp-content/uploads/2019/03/favicon-36x36.png Cancer Manthan https://cancermanthan.com 32 32 Kakadiche Patolya (काकडीच्या पातोळ्या) https://cancermanthan.com/kakadiche-patolya/ Sat, 15 Aug 2020 07:46:16 +0000 https://cancermanthan.com/?p=538 #top .av-special-heading.av-av_heading-11c6a0f23f139ab6e2ef6d1119bd926d{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-11c6a0f23f139ab6e2ef6d1119bd926d .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-11c6a0f23f139ab6e2ef6d1119bd926d .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-11c6a0f23f139ab6e2ef6d1119bd926d .av-subheading{ font-size:15px; }

Kakadiche Patolya (काकडीच्या पातोळ्या)

The post Kakadiche Patolya (काकडीच्या पातोळ्या) first appeared on Cancer Manthan.

]]>
Amla Jam (आवळा मुरांबा) मोरावळा https://cancermanthan.com/amla-jam-awala-muranba/ Mon, 09 Dec 2019 10:05:26 +0000 https://cancermanthan.com/?p=421 #top .av-special-heading.av-av_heading-d932baa89f6aa88a3562a66ea4be7297{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-d932baa89f6aa88a3562a66ea4be7297 .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-d932baa89f6aa88a3562a66ea4be7297 .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-d932baa89f6aa88a3562a66ea4be7297 .av-subheading{ font-size:15px; }

Amla Jam (आवळा मुरांबा) मोरावळा

बहुगुणी आवळा माहित नाही अशी क्वचितच कुणी मराठी व्यक्ती असेल. त्रिदोषनाशक – वात,पित्त,कफ यांचा नाश करणारा, वार्धक्याला दूर ठेवणारा, केसांना झळाळी देणारा, पचन सुधारणारा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा आवळा प्रत्येकाच्या आहारात रोज असलाच पाहिजे.
वर्षभर आवळा टिकवण्याचा सोपा मार्ग म्हणजे मोरावळा बनवणे. आवळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिजवल्यावरही त्यातले क जीवनसत्व खूप प्रमाणात टिकून राहाते. बाजारात मिळणार्या मोरावळ्या मधे टिकवण्यासाठी नाना रसायने घातलेली असतात, जी आपल्या आरोग्यासाठी चांगली नसतात. तेव्हा चला बनवूया केमिकल विरहित मोरावळा घरच्या घरी.
आजकाल अॅसिडीटीचा त्रास स्ट्रॉंग औषधे घेणार्या रुग्णांनाच नव्हे तर बहुतेक नाॅर्मल लोकांनाही होत असतो. 1-2 चमचे मोरावळ्याच्या सेवनाने हा त्रास खूप कमी होतो.
बघणार ना करून हा सोप्पा उपाय.

The post Amla Jam (आवळा मुरांबा) मोरावळा first appeared on Cancer Manthan.

]]>
Mash Melon Porridge (चिबुडाचे पायसम) https://cancermanthan.com/mash-melon-porridge/ Mon, 09 Dec 2019 09:58:28 +0000 https://cancermanthan.com/?p=419 #top .av-special-heading.av-av_heading-04b5099e852301938b5777c1f8248b93{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-04b5099e852301938b5777c1f8248b93 .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-04b5099e852301938b5777c1f8248b93 .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-04b5099e852301938b5777c1f8248b93 .av-subheading{ font-size:15px; }

Mash Melon Porridge (चिबुडाचे पायसम)

चिबूडाचे पायसम्

खरबूज टरबूजाच्या कुळातील चिबूड हे फळ आहे. श्रावण ते दिवाळी पर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात पिकविले जाते. चवीला गोड, रसदार, पोटभरे असे हे फळ. ज्यूस, मिल्कशेक बनवा किंवा नुसतेच थोडी साखर, काळेमिरी टाकून खा लगेच तरतरी आणते. गणपती – नवरात्रात चिबूडाचा मोठा मान. गणपतीच्या प्रसादासाठी चिबूड हवेच. तसेच नवरात्रात उपवास करणार्यांना चिबूडाचा मोठा आधार. गोव्यात कारवारमधे दिवाळीत या चिबूडाच्या पायसम् मधे पोहे टाकून खाल्ले जातात.

चिबूड, नारळ आणि गूळ अशा आजूबाजूला सहज उपलब्ध असणार्या गोष्टी वापरून बनवलेली ही खिर नक्कीच एखाद्या कोंड्याचा मांडा करणार्या चतुर गृहीणीने शोधलेली असणार. गोडधोड , आरोग्यदायी आणि कमी खर्चात बनणारे पक्वान्न खाउन गरीब श्रीमंत सगळ्यांना सण साजरा करता येतो.

The post Mash Melon Porridge (चिबुडाचे पायसम) first appeared on Cancer Manthan.

]]>
Patolya in Turmeric Leaves (हळदीच्या पानातील पातोळ्या) https://cancermanthan.com/patolya-in-turmeric-leaves-haladichya-patolya/ Mon, 09 Dec 2019 09:50:40 +0000 https://cancermanthan.com/?p=415 #top .av-special-heading.av-av_heading-742a13c3d0a8a34988476843c18848da{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-742a13c3d0a8a34988476843c18848da .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-742a13c3d0a8a34988476843c18848da .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-742a13c3d0a8a34988476843c18848da .av-subheading{ font-size:15px; }

Patolya in Turmeric Leaves (हळदीच्या पानातील पातोळ्या)

हळदीच्या पानातील पातोळ्या

अन्नाचा रसास्वाद पंचेंद्रियांनी घ्यावा. आपण अन्न केवळ भूक भागवण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी खातो असे नाही. काही काही पदार्थ शरीर, मन आणि आत्म्यालाही शांत करतात. भारतीय संस्कृती असे मानते की आपण जे काही खातो शरीरात वसलेल्या परमात्म्याला अर्पण होते.‍ हळदीच्या पानातील यातोळी हा असाच स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारा पदार्थ. पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या पारीत वेलचीचा सुवास लेवून गूळ- खोबऱ्याचे सारण सजते. पोपटी हिरव्या हळदीच्या पानात पातोळी खुलून दिसते. वाफवताना घरभर दरवळणारा हळदीच्या पानांचा परिमळ मनाला प्रसन्न करतो. गूळ- खोबरे बुद्धिवर्धक आहे असे मानतात. हळदीच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. वाफवल्याने पातोळी पचायला हलकी होते.
वाफेभरत्या लुसलुशीत पातोळ्यांचा जेव्हा बाप्पाला नैवेद्य दाखवतो तेव्हा जीवनातील सुंदर गोष्टींबद्दल हृदय कृतजतेने भरून येते. आपोआप डोळे आणि हात जोडले जातात. मग खाणे हे केवळ उदरभरण न होता यज्ञकर्म होते. तथास्तु 🙏🙏🙏

The post Patolya in Turmeric Leaves (हळदीच्या पानातील पातोळ्या) first appeared on Cancer Manthan.

]]>
Amaranth Vegetable (देठाची भाजी) https://cancermanthan.com/amaranth-vegetable-dethachi-bhaji/ Mon, 09 Dec 2019 09:35:49 +0000 https://cancermanthan.com/?p=407 #top .av-special-heading.av-av_heading-2254484ab03a012096f928d840b3d90c{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-2254484ab03a012096f928d840b3d90c .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-2254484ab03a012096f928d840b3d90c .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-2254484ab03a012096f928d840b3d90c .av-subheading{ font-size:15px; }

Amaranth Vegetable (देठाची भाजी)

देठ / श्रावण माठाची भाजी

हिंदी सिनेमांचा आपल्यावर इतका प्रभाव आहे कि मेथी के पराठे आणि पालक पनीर या व्यतिरिक्त दुसर्या पालेभाज्या असतात हे आपण विसरून गेलो आहोत. किती विविधता आहे आपल्याकडे. लाल माठ, राजगिरा, देठ/ श्रावणी माठ, हिरवा माठ, पोकळा, खापरा, चवळी, छोटी मेथी…… . याशिवाय पावसाळ्यात मिळणार्या पालेभाज्या वेगळ्याच. या भाज्यांमधे शरीराला उपयुक्त अशी पोषक द्रव्ये , जीवनसत्वे इ ठासून भरलेली असतात. प्रत्येक ऋतूतील हे अप्रूपाचे लेणे सगळ्यांच्या पोटात एकदा तरी जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याची सांगड सणावारांशी घातली. श्रावण भाद्रपदात भाज्यांची रेलचेल असते म्हणून ऋषीपंचमीला होणारी ऋषीची भाजी किंवा गौरी साठी बनविण्यात येणार्या 16 भाज्या यामध्ये भाज्यांचा मुक्त हस्ताने वापर केलेला असतो.

या भाज्यांमधे आवर्जून वापरली जाणारी भाजी म्हणजे देठ किंवा श्रावणी माठाची भाजी. राजगीर्याच्या कुळातील ही भाजी पावसाळ्यातील 2 -3 महिने मिळते. भरपूर कॅल्शियम , लोह, अ आणि ब जीवनसत्व असणाऱ्या या भाजीत फायबरही खूप असतात. ऋषीच्या आणि गौरीसाठी केल्या जाणाऱ्या भाजीत देठाच्या भाजीला मानाचे स्थान आहे. मिक्स भाजीमध्ये देठ चांगले लागतातच पण फक्त देठाची मूगडाळकिंवा चणाडाळ, वाल, चणे घालून केलेली भाजीही चविष्ट लागते.
माझ्या अनेक मैत्रिणी यावेळी फक्त देठाची भाजी करून बघणार आहेत. तुम्हीही करून बघणार ना !!😊

The post Amaranth Vegetable (देठाची भाजी) first appeared on Cancer Manthan.

]]>
Spiny Gourd Vegetable (करटोलीची भाजी) https://cancermanthan.com/spiny-gourd-vegetable/ Thu, 29 Aug 2019 13:14:28 +0000 https://cancermanthan.com/?p=387 #top .av-special-heading.av-av_heading-dc77b13fac4b4b9f7d86a73c448c140f{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-dc77b13fac4b4b9f7d86a73c448c140f .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-dc77b13fac4b4b9f7d86a73c448c140f .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-dc77b13fac4b4b9f7d86a73c448c140f .av-subheading{ font-size:15px; }

Spiny Gourd Vegetable (करटोलीची भाजी)

पावसाळ्यातील रानभाज्यांमधील एक वैेशिष्ट्यपूर्ण भाजी म्हणजे करटोली किंवा कंटोली . हिरव्या पोपटी रंगाची, अंगावर बारीक काटे असणारी ही गोल फळे बाजारात आपले लक्ष वेधून घेतात.संस्कृतमधे हिला कर्कोटकी किंवा कर्कोटी म्हणतात. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू इतकेच काय पण आसाम, बंगाल, मणिपूर इथेही करटोनी खाल्ली जाते. अगदी श्रीलंका ,ब्रह्मदेशातही करटोली लोकप्रिय आहे.

थोड्या कडू चवीची असल्यामुळे काही जणांना आवडत नाही. परंतु थोडा गूळ घालून बनवली तर कडू गोड अशी ही करटोलीची भाजी फार स्वादिष्ट लागते.
रक्तातील शर्करा नियंत्रणाखाली ठेवायला ही भाजी मदत करते, मधुमेहावरील पारंपारिक उपचारात करटोलीचा उपयोग केला जातो.
प्रत्येक हंगामात येणाऱ्या विविध भाज्या एकदातरी खाव्या असे माझी आजी सांगत असे. आता मोठेपणी ते पटतेय.
करून बघणार ना करटोलीची आंतरराष्ट्रीय भाजी!!

The post Spiny Gourd Vegetable (करटोलीची भाजी) first appeared on Cancer Manthan.

]]>
Satvik Moong Vegetable (मूगाची उपवासाची भाजी) https://cancermanthan.com/satvik-moong-vegetable/ Thu, 29 Aug 2019 12:13:47 +0000 https://cancermanthan.com/?p=376 #top .av-special-heading.av-av_heading-8e83bdf29403a91c791478f46f1c081c{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-8e83bdf29403a91c791478f46f1c081c .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-8e83bdf29403a91c791478f46f1c081c .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-8e83bdf29403a91c791478f46f1c081c .av-subheading{ font-size:15px; }

Satvik Moong Vegetable (मूगाची उपवासाची भाजी)

आषाढ- श्रावण महिना आला म्हणजे सणवार , व्रतवैकल्ये, उपवास सुरु होतात. उपवास म्हणजे उप+वास. देवाच्या जवळ राहाणे. परमात्म्याशी तद्रुप होणे. यासाठी हलका आहार घेणे अपेक्षित आहे. परंतु उपवासाला साबुदाणा खिचडी, वडे असा तेलकट,जड आहार खाऊन पित्त मात्र उफाळते. त्याउलट वरीचा भात, मूगाची उपवासाची भाजी, भोपळ्याचे भरीत, राजगिर्याचेपीठ – रताळ्याचे थालीपिठ, ताक, लिंबाचे गोड लोणचे असा हलका आहार घेतला तर चवीतही बदल होतो आणि पोटालाही आराम मिळतो. जैन धर्मियही खूप दिवसांचे उपवास मूगाचे पाणी किंवा उकडलेले मूग घेउन सोडतात आणि मग हळूहळू नेहमीचा आहार घेतात.

केमोथेरेपी मधे कर्करोगाच्या पेशींबरोबर चांगल्या पेशींचाही नाश होतो किंवा नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी किंवा नवीन पेशींच्या निर्मिती साठी प्रथिनांची गरज लागते. म्हणून कर्करोग रुग्णांची ट्रीटमेंट चालू असताना डाॅक्टर हाय प्रोटीन डाएट घ्यायला सांगतात.

शाकाहारी जेवणात डाळी आणि कडधान्ये यांमधून प्रथिनांचा चांगला पुरवठा होतो. मूग-मसूर हे पचायला हलके परंतु राजमा, छोले, वाटाणे, पावटे इ. कडधान्ये पचायला जड. खाल्लयावर खूप गॅसेस होतात. म्हणून शक्यतो रुग्णांनी मूग-मसूर खावे.

आजारपणात भूक मंदावते, पचन नीट होत नाही. आयुर्वेदानुसार मूग जठराग्नी वाढवतात. हातसडीचा लाल तांदूळ आणि मूग हे रुग्णाच्या पोषणासाठी उत्कृष्ट मानले जातात.

ही मूगाची सात्विक भाजी बनत असतानाच साजुक तूप आणि जिर्याचा दरवळ भूक चाळवून जातो

The post Satvik Moong Vegetable (मूगाची उपवासाची भाजी) first appeared on Cancer Manthan.

]]>
Fodashi Patties (फोडशीच्या वड्या) पावसाळी रानभाज्या https://cancermanthan.com/fodashi-patties/ Thu, 29 Aug 2019 12:00:27 +0000 https://cancermanthan.com/?p=363 #top .av-special-heading.av-av_heading-1ff874967309e847d5f9ad90b500f437{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-1ff874967309e847d5f9ad90b500f437 .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-1ff874967309e847d5f9ad90b500f437 .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-1ff874967309e847d5f9ad90b500f437 .av-subheading{ font-size:15px; }

Fodashi Patties (फोडशीच्या वड्या) पावसाळी रानभाज्या

Fodashi Patties (फोडशीच्या वड्या) पावसाळी रानभाज्या

धरती प्रखर उन्हाने पोळल्या नंतर मोसमी पाऊस ढगांच्या गडगडाटासह वाजतगाजत येतो. पहिल्या पावसाच्या सरींनी धरणी भिजली की मातीत झोपलेल्या नाना तर्हेच्या बियांना आणि कंदांना जाग येते. नाना परिच्या वेली, झुडूपे, गवत धरणीला हिरवा शालू नेसवतात. काही दिवसांचे, आठवड्यांचे क्वचित महिन्यांचे आयुष्य असते यांना. खूपशा वनस्पतींमधे औषधी गुणधर्म असतात. काही वनस्पतीं खाण्यासाठी वापरल्या जातात. जंगलकन्या असणार्या आदिवासी स्त्रियांना याचे ज्ञान असते.

पावसाळा सुरु झाला की आदिवासी बायका बाजारात नाना तर्हेच्या भाज्या, पाला, फळे घेउन येतात.पावसाळ्याच्या चार महिन्यात टप्याटप्याने वेगवेगळ्या भाज्या बाजारात उपलब्ध होतात. या भाज्यांबद्दल लोकांमधे अज्ञान आहे. आईआजी खेरीज घरात दुसरे कोणी या भाज्या खात नाहीत. औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्या चविष्ट, आकर्षक रूपात या ह्विडीओं मधे सादर केल्या आहेत.

या भाज्यांच्या मांदियाळीत बिनीचे शिलेदार आहेत कोरळाची पाने आणि फोडशी ( कुळी, कुंबळी).

लवकर लवकर बाजारात जाऊन या भाज्या घेऊन या कारण जेमतेम पंधरावीस दिवसच या भाज्या उपलब्ध असतात.

The post Fodashi Patties (फोडशीच्या वड्या) पावसाळी रानभाज्या first appeared on Cancer Manthan.

]]>
Koral Dal (कोरळाची आमटी) पावसाळी रानभाज्या https://cancermanthan.com/koral-dal/ Thu, 29 Aug 2019 11:54:37 +0000 https://cancermanthan.com/?p=362 #top .av-special-heading.av-av_heading-753428a08d3db85a6a9212d718e5b74f{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-753428a08d3db85a6a9212d718e5b74f .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-753428a08d3db85a6a9212d718e5b74f .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-753428a08d3db85a6a9212d718e5b74f .av-subheading{ font-size:15px; }

Koral Dal (कोरळाची आमटी) पावसाळी रानभाज्या

Mansoon Special Vegetables Koral Dal (कोरळाची आमटी)

धरती प्रखर उन्हाने पोळल्या नंतर मोसमी पाऊस ढगांच्या गडगडाटासह वाजतगाजत येतो. पहिल्या पावसाच्या सरींनी धरणी भिजली की मातीत झोपलेल्या नाना तर्हेच्या बियांना आणि कंदांना जाग येते. नाना परिच्या वेली, झुडूपे, गवत धरणीला हिरवा शालू नेसवतात. काही दिवसांचे, आठवड्यांचे क्वचित महिन्यांचे आयुष्य असते यांना. खूपशा वनस्पतींमधे औषधी गुणधर्म असतात. काही वनस्पतीं खाण्यासाठी वापरल्या जातात. जंगलकन्या असणार्या आदिवासी स्त्रियांना याचे ज्ञान असते.

पावसाळा सुरु झाला की आदिवासी बायका बाजारात नाना तर्हेच्या भाज्या, पाला, फळे घेउन येतात.पावसाळ्याच्या चार महिन्यात टप्याटप्याने वेगवेगळ्या भाज्या बाजारात उपलब्ध होतात. या भाज्यांबद्दल लोकांमधे अज्ञान आहे. आईआजी खेरीज घरात दुसरे कोणी या भाज्या खात नाहीत. औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्या चविष्ट, आकर्षक रूपात या ह्विडीओं मधे सादर केल्या आहेत.

या भाज्यांच्या मांदियाळीत बिनीचे शिलेदार आहेत कोरळाची पाने आणि फोडशी ( कुळी, कुंबळी).

लवकर लवकर बाजारात जाऊन या भाज्या घेऊन या कारण जेमतेम पंधरावीस दिवसच या भाज्या उपलब्ध असतात.

The post Koral Dal (कोरळाची आमटी) पावसाळी रानभाज्या first appeared on Cancer Manthan.

]]>
Green Liver Masala (हिरव्या मसाल्यातील कलेजी) https://cancermanthan.com/green-liver-masala/ Thu, 29 Aug 2019 09:33:01 +0000 https://cancermanthan.com/?p=329 #top .av-special-heading.av-av_heading-dbeacc45a811a45a66b8946bb1431057{ padding-bottom:10px; color:#0009bf; } body .av-special-heading.av-av_heading-dbeacc45a811a45a66b8946bb1431057 .av-special-heading-tag .heading-char{ font-size:25px; } .av-special-heading.av-av_heading-dbeacc45a811a45a66b8946bb1431057 .special-heading-inner-border{ border-color:#0009bf; } .av-special-heading.av-av_heading-dbeacc45a811a45a66b8946bb1431057 .av-subheading{ font-size:15px; }

Green Liver Masala (हिरव्या मसाल्यातील कलेजी)

हिरव्या मसाल्यातील कलेजी

लहानपणी कधी आजारी पडलो, खूप अशक्तपणा आला की आजी सांगायची ,” काहीतरी पौष्टीक खा.” पचायला हलका तरीही ताकद वाढवणारा आणि तोंडाची रुची वाढवणारा पदार्थ म्हणजे पौष्टीक पदार्थ. मुगाचे कढण, भाज्यांचे सूप, चिकन सूप, तिळी कलेजीचा रस्सा हे काही पौष्टीक पदार्थ. या पदार्थांना आयुर्वेदही पौष्टीक मानतो आणि रुग्णाचे बल वाढवण्यासाठी आवर्जून खावे असे सांगतो. या पदार्थांमधे भरपूर प्रथिने असतात. प्रथिनांमुळे नवीन पेशींची निर्मीती केली जाते, शरीराची हानी भरून निघते. पण अजून असे काय असते या पदार्थांमधे जे आपल्याला शक्ती देते?

आधुनिक संशोधनात काही वेगळीच गोष्ट समोर आली. आपण खाल्लेल्या पिष्टमय पदार्थांचे शरीरात पचन होऊन साखर तयार होते. या साखरेवर अजून प्रक्रिया होउन ATP (Adenosine tri phosphate) हे ऊर्जा देणारे संयुग बनते. या प्रक्रिये मधे अनेक वितंचकांचा (enzymes) सहभाग असतो. यातील एक महत्त्वाचे वितंचक आहे
Co Q10.
निरोगी माणसाच्या शरीरात एका साखरेच्या रेणूपासून ATP चे 38 रेणू तयार होतात. आपण जेव्हा प्रतिजैविके किंवा तत्सम भारी औषधे घेतो तेव्हा ही प्रक्रिया मंदावते व आपल्याला थकवा येतो.
भिजवलेले मूग, कलेजी यांमधे Co Q10 भरपूर प्रमाणात असते म्हणून हे पौष्टीक पदार्थ खाऊन आपल्याला तरतरी येते.
नैसर्गिक तर्हेने आपल्या शरीरात ताकद वाढावी यासाठी सादर आहे चमचमीत ‘ हिरव्या मसाल्यातील कलेजी’ !!

The post Green Liver Masala (हिरव्या मसाल्यातील कलेजी) first appeared on Cancer Manthan.

]]>