Amla Jam (आवळा मुरांबा) मोरावळा

बहुगुणी आवळा माहित नाही अशी क्वचितच कुणी मराठी व्यक्ती असेल. त्रिदोषनाशक – वात,पित्त,कफ यांचा नाश करणारा, वार्धक्याला दूर ठेवणारा, केसांना झळाळी देणारा, पचन सुधारणारा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा आवळा प्रत्येकाच्या आहारात रोज असलाच पाहिजे.
वर्षभर आवळा टिकवण्याचा सोपा मार्ग म्हणजे मोरावळा बनवणे. आवळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिजवल्यावरही त्यातले क जीवनसत्व खूप प्रमाणात टिकून राहाते. बाजारात मिळणार्या मोरावळ्या मधे टिकवण्यासाठी नाना रसायने घातलेली असतात, जी आपल्या आरोग्यासाठी चांगली नसतात. तेव्हा चला बनवूया केमिकल विरहित मोरावळा घरच्या घरी.
आजकाल अॅसिडीटीचा त्रास स्ट्रॉंग औषधे घेणार्या रुग्णांनाच नव्हे तर बहुतेक नाॅर्मल लोकांनाही होत असतो. 1-2 चमचे मोरावळ्याच्या सेवनाने हा त्रास खूप कमी होतो.
बघणार ना करून हा सोप्पा उपाय.