Spiny Gourd Vegetable (करटोलीची भाजी)
पावसाळ्यातील रानभाज्यांमधील एक वैेशिष्ट्यपूर्ण भाजी म्हणजे करटोली किंवा कंटोली . हिरव्या पोपटी रंगाची, अंगावर बारीक काटे असणारी ही गोल फळे बाजारात आपले लक्ष वेधून घेतात.संस्कृतमधे हिला कर्कोटकी किंवा कर्कोटी म्हणतात. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू इतकेच काय पण आसाम, बंगाल, मणिपूर इथेही करटोनी खाल्ली जाते. अगदी श्रीलंका ,ब्रह्मदेशातही करटोली लोकप्रिय आहे.
थोड्या कडू चवीची असल्यामुळे काही जणांना आवडत नाही. परंतु थोडा गूळ घालून बनवली तर कडू गोड अशी ही करटोलीची भाजी फार स्वादिष्ट लागते.
रक्तातील शर्करा नियंत्रणाखाली ठेवायला ही भाजी मदत करते, मधुमेहावरील पारंपारिक उपचारात करटोलीचा उपयोग केला जातो.
प्रत्येक हंगामात येणाऱ्या विविध भाज्या एकदातरी खाव्या असे माझी आजी सांगत असे. आता मोठेपणी ते पटतेय.
करून बघणार ना करटोलीची आंतरराष्ट्रीय भाजी!!
