Beat The Heat – by natural means (उष्णतेशी सामना – घरगुती पद्धतीने)
ट्रीटमेंट चालू असताना रुग्ण अनेक साइड इफेक्टसनी त्रस्त असतो. उदा.शरीरातील उष्णता वाढणे, ऍसिडीटी, लघवीला जळजळ, बेचैैनी, थकवा इ. उन्हाळ्यात हे त्रास कैक पटीने वाढतात.या त्रासांसाठी औषधे तरी किती घेणार?
या सर्वांसाठी साधे,सोप्पे घरगुती उपाय आहेत. उदा. धणे-जिर्याचे पाणी, सब्जा, लिंबू- आवळा- कोकम सरबत इ. या पेयांनी शरीर आंतर्बाह्य थंड होते, ताजेतवाने वाटते आणि इतरही अनेक आरोग्यदायी लाभ होतात. उदा. धण्याने थंडावा मिळतो. जिर्या मुळे पचन चांगले होते तसेच मूत्रप्रव्रुत्तीही सहज होते. कोकममुळे तोंडाला रुची येते आणि अतिसारावरही नियंत्रण येते. आवळा पित्तशामक तर आहेच आणि प्रतिकारशक्तीही वाढवतो.
माझ्या प्रदीर्घ आजारपणात अशाच सोप्या, घरगुती उपायांनी औषधांचे साइड इफेक्टस कमी झाले होते.
सर्वसामान्य लोकांनाही उन्हाळ्याचा त्रास होतोच. त्यानांही हे उपाय लाभदायक ठरतील.
एकदा करुन तर बघा !!
